समाजसेवींतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप 

0

 

आवार, लोकशाही न्यूज नेटवर्क;

गुरू पौर्णिमा या दिनाचे औचित्य साधून जळगांव शहर पोलिस स्टेशनचे कार्यरत सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री.कैलास चौधरी, जळगांव जनता बँकेचे डेप्युटी मॅनेजर श्री.अरविंद परमार आणि जिल्हा न्यायालयातील कर्मचारी श्री. बी. जी.नाईक यांच्या आर्थिक योगदानातून जळगांव तालुक्यातील “आवार” या छोट्याशा खेडेगावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ते ४ थी मधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, वह्या, कंपास कीट, वॉटर बॅग, लंच बॉक्स इत्यादी शैक्षणिक साहित्याचे आणि अंगणवाडीतील सर्व बालकांना बिस्किटाचे आज बुधवार दिनांक १३/७/२०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता समाज सेवेच्या स्वरूपात मोफत वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमास शाळेचे मुख्यध्यापक श्री.पंडित सपकाळे, उपशिक्षक श्री. भिका सपकाळे, सरपंच श्री. सपकाळे आणि अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास गट शिक्षण अधिकारी श्री. पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील कार्यक्रमास पालकांची आणि गावकऱ्यांची देखील उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.