महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार.. आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशासह राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजवन विस्कळीत झालं आहे.

महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि कर्नाटकमध्ये (Karnataka) देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळं गुजरातमधील अनेक जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले आहेत. तर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Ahmedabad National Highway) वाहतूक देखील काही काळ ठप्प झालीय.

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय. महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टीमुळं राज्यात आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू झाला आहे.  तर 181 जनावरं दगावली आहेत. तर आजवर 7 हजार 963 नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. राज्यात विविध जिल्ह्यात एकूण 14 एनडीआरएफ (NDRF teams) आणि 6 एसडीआरएफची पथकं (SDRF Teams) तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी बारकाईनं यावर निरीक्षण करत आहे. सर्व अधिकारी माझ्या संपर्कात आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगितले.

पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.