‘या’ दिवशी रिलीज होणार ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘महेंद्र सिंह धोनी’ (Mahendra Singh Dhoni) या नावातच भरपूर चाहत्यांचे इमोशन्स लपले आहे. ज्या पद्धतीनं धोनीने चाहत्यांचा प्रेम, आपुलकी मिळवली आहे. ती आतापर्यंत कोणी मिळवली नसेल. तसं पहिले तर धोनीच्या वयक्तिक आयुष्याबद्दल सर्वांनाच जाणून घायच असत. आणि आता मोठ्या पडद्यावर त्याच्या आयुष्यातील बऱ्याच रंजक गोष्टी चात्यांना पाहायला मिळणार आहे. लवकरच धोनीच्या जीवनारवर आधारित ‘मिस्टर अँड मिसेस माही’ (Mr. and Mrs. Mahi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याआधी ही एम. एस. धोनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने धोनीची भूमिका अगदी हुबेहूब भूमिका साकारली होती. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा धोनीच्या जीवनावरचा दुसरा चित्रपट असून, या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपाऊर्वीच करण्यात आली होती. आणि आता या सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

कोण असणार धोनीच्या भूमिकेत
‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपट राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) मुख्य भूमिका साकारतांना दिसणार आहे. ‘ रुही’ चित्रपटानंतर हि जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करतांना दिसणार आहे. करण जोहरच्या (Karan Johar) बॅनर अंतर्गत हा चित्रपट बनविण्यात आला आहे. हा चित्रपट १५ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार असल्याचं धर्मा प्रोडक्शन (Dharma Production) कडून सांगण्यात आलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.