मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

प्रवास करुन थकल्याने अचानक मुंडेंच्या छातीत दुखू लागले होते. त्यातच ते चक्कर येऊन खाली कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंडे यांना किरकोळ त्रास जाणवू लागला होता. मंगळवारी सकाळपासून धनंजय मुंडे यांना अस्वस्थ वाटत होते. शेवटी संध्याकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना स्ट्रोक आल्याची माहिती मिळाली आहे. धनंजय मुंडे हे सायंकाळी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर होते. जवळपास 06.30 पर्यंत ते त्याच ठिकाणी होते. अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात 07.00 च्या दरम्यान दाखल करण्यात आलं.

मुंडे यांची प्रकृती स्थिर – आरोग्यमंत्री टोपे

मंत्री धनंजय मुंडे याना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती मिळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील रुग्णालयात पोहचले. यावेळी त्यांनी मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना सांगितले. त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे, कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.