धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

14 ऑक्टोंबर 1956 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह हिंदु धर्माचा त्याग करून बौध्द धम्म स्वीकारला होता. आणि भारतातून नामशेष होत असलेल्या भारतातीलच बौद्ध धम्माला नव संजीवनी दिली. ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 358 ग्रुप जळगाव शहर आणि रमाई युवती ग्रुप यांच्या तर्फे बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बुद्धांच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. राजेश झाल्टे साहेब 358 ग्रुप संस्थापक अध्यक्ष अजय गरुड, अध्यक्ष पंकज सोनवणे, उपाध्यक्ष गणेश पगारे, सचिव सुनिल शिरसाठ, सहसचिव नितीन अहिरे आणि सावित्री रमाई ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष गायत्री ठाकूर यांच्यासह प्रा.डॉ प्रकाश कांबळे, राजू खरे, सामाजिक कार्यकर्ता राधे शिरसाठ, समाजसेवक विशाल अहिरे, समाजसेवक सोनु अढाळे हे उपस्थीत होते.

बुद्ध भिम गीतांचा प्रेक्षकांनी मनमुराद आनद लुटला, यावेळी शरद भालेराव, संजय सूर्यवंशी, पूजा सोनवणे, अंजली मोरे आणि त्यांच्या ग्रुपतर्फे गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघमित्रा इंधाटे यांनी केले. तर कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी भिमान फाईट ग्रुप, बाबा ग्रुप, सर्व धर्म समभाव ग्रुप, नागवंशी संघ यांनी सहकार्य केले.

दरम्यान कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भीम अनुयायची उपस्थित होते. प्रामुख्याने महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.

Leave A Reply

Your email address will not be published.