लोकशाही न्यूज नेटवर्क
पावसाळ्यानंतर देशातील अनेक भागांत थंडीला सुरुवात झाली आहे. तसेच, दक्षिण आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अजूनही पाऊस सुरूच आहे. राजधानो दिल्लीत पुढील दोन दिवस हलके धुके राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. IMD नुसार, केरळमध्ये २३ आणि २४ ऑक्टोबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मिझोरम, नागालँड आणि मणिपूरमध्ये २४ ऑक्टोबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज दि. २१ रोजी दिल्लीत कमाल तापमान ३१ अंश आणि किमान तापमान १६ अंश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तापमाचा पारा अजून खाली जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी दिल्ली-एनसीआरचे किमान तापमान १६ अंशांवर नोंदवले गेले आहे, जे सामान्य तापमानापेक्षा दोन अंश कमी आहे.
कसे असेल हवामान ?
आज राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यानंतर हळूहळू थंडी वाढण्यास सुरुवात होईल. उत्तर प्रदेशातही हळूहळू हवामान बदलायला सुरुवात झाली आहे. येथे दिवसा हवामान सामान्य राहते, परंतु सकाळी हलकीशी थंडी पडू लागली आहे. प हवामान खात्यानुसार, आज २१ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशमधील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील. यासोबतच केरळ आणि लक्षद्वीपमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारी आंध्र प्रदेश, किनारी कर्नाटक, तामिळनाडू, सिक्कीम आणि ईशान्य भारतात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय १०१ ते २०० मध्यम श्रेणीत आणि २०१ ते ३०० दरम्यान वाईट श्रेणीत येतात. ३०१ ते ४०० दरम्यानची स्थिती वाईट मानली जाते, यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याची गरज सरकारकडून सांगण्यात आली आहे.