दिल्ली मेट्रोत किळसवाणा प्रकार, बुटात कोल्ड ड्रिंक टाकत केले असे काही….

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या मेट्रो आणि ट्रेन्समध्ये व्हिडिओ आणि रिल्स बनवण्याचा ट्रेंड आहे. अनेकजण रिल्स बनवून सोशल मीडियावर हिट होण्याचा प्रयत करत असतात. कोणी डान्स करतं, तर कोणी गाण म्हणतात. त्यात असे काही नमुने असतात जे विचित्र हरकारी करून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न कारणात, अशा प्रयत्नांत काही जण खूप वाईट पद्धतीने ट्रोल होत असता. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा संताप अनावर होत आहे. कारण दिल्ली मेट्रोमध्ये त्यांनी किळसवाणा प्रकार केला आहे.

https://www.instagram.com/reel/C1heZomvAzS/

 

हे कपल बुटांमध्ये कोल्ड ड्रिंक पिट आहे. व्हिडिओमध्ये मुलगा आणि मुलगी मेट्रोत असून, या दरम्यान मुलगा आपला बूट काढतो आणि हातात घेत. त्यानंतर शेजारी बसलेली मुलगी ते कोल्ड ड्रिंक बुटात टाकते. त्यानंतर मुलगा बुटातले कोल्ड ड्रिंक स्ट्रॉ ने पितो. त्यानंतर मुलगी सुद्धा अशीच काहीतरी हरकत करताना दिसते. कोल्ड ड्रिंक पिण्याच्या तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हा पाहिल्या असतील. पण कोणी बुटातून कोल्ड ड्रिंक पितोय हे तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहिलं असेल. हा व्हिडिओ पाहतान खूप किळसवाणेपणाची फिलिंग येते.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर rkramaad_009 या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत १.६ मिलियन लोकांनी हा व्हिडिओ पहिला असून १७ हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.