खुशखबर..केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवाळीपूर्वी  मोदी सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खुशखबर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महागाई भत्ता 4 टक्के वाढून 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात आला आहे. 1 जुलै 2023 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

सरकार वर्षातून दोनदा DA मध्ये सुधारणा करते. ज्याचा लाभ त्यांना 1 जानेवारी व 1 जुलैपासून दिला जातो. देशात सुमारे 52 लाख कर्मचारी केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करतात आणि 60 लाख पेन्शनधारक आहेत, ज्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.

महागाई भत्त्यातील बदलाचा थेट परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर दिसून येतो. त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारही वाढतो. सरकार महागाई दराची आकडेवारी लक्षात घेऊन निर्णय घेते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित असते.

ऑक्टोबरच्या वेतनात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांच्या थकबाकीचा समावेश असेल. म्हणजेच, जर तुमच्या पगारात मासिक 600 रुपयांची वाढ झाली, तर 3 महिन्यांची डीएची थकबाकी म्हणजेच जुलै ते सप्टेंबरपर्यंतचा प्रलंबित DA देखील पगारात येणार आहे. ऑक्टोबरचा डीए पगारात जोडल्यास ऑक्टोबरच्या पगार वाढीत 2,400 रुपये येतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.