एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची मुंबई पोलीस दलात एंट्री !

0

 

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलिसांत दिसणार आहेत. राज्य पोलीस दलात करण्यात आलेल्या बदल्यांची यादी जारी करण्यात आली आहे. यात दया नायक याच्यासह तीन पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे.

दया नायक हे सध्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात कार्यरत आहेत. त्यांच्यासह चंदन चौकी येथे तैनात दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) असलेले दौलत साळवे आणि ज्ञानेश्वर वाघ यांची देखील मुंबई शहरात बदली करण्यात आली आहे. त्यांची गुन्हे शाखेत नियुक्ती होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

८० गुंडांचे एन्काउंटर

मुंबई पोलीस दलात दया नायक यांची एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख आहे. दया नायक यांची 1995 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी प्रदीप शर्मा यांच्यासोबत गु्न्हे अन्वेषण शाखेत काम केले. शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात त्यांचा समावेश होता. दया नायक यांनी जवळपास 80 गुंडाचे एन्काउंटर केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.