१६ वर्षांपासून दारुची सवय १५ दिवसातच सुटली

0

संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्रात तज्ञ डॉक्टरांद्वारे उपचार

बुलढाणा – मागील १६ वर्षांपासून दारुची लत असलेल्या सुनिल (नाव बदललेले) नामक व्यक्‍तीची दारुची सवय १५ दिवसातच सोडविण्यास केंद्र शासन मान्य संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्राला यश आले. यासंदर्भात खुद्द रुग्णाने मनोगत व्यक्‍त करुन दारु सोडवायची असेल तर खात्रीशीर उपचारांसाठी संकल्प येथे येण्याचे आवाहनही केले.

बुलढाणा येथील रहिवासी सुनिल या रुग्णाने मनोगताद्वारे सांगितले की, गेल्या १६ वर्षांपासून मला दारुचे व्यसन जडले होते, सोबतीला तंबाखू देखील मी खायचो. यामुळे शरिरावर तर वाईट परिणाम झालेच परंतु कुटूंब देखील माझ्यामुळे त्रस्त झाले. दरम्यानच्या कालावधीत डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्माथ रुग्णालयात सुरु असलेल्या संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्राची बातमी मी पेपरमध्ये वाचली आणि मनाशी निश्चय केली आता दारुला सोडयाचेच.. मी येथे आलो, येथे व्यसनमुक्‍ती तज्ञ डॉ.विलास चव्हाण यांच्याशी माझी भेट झाली. यावेळी त्यांनी मला माझी संपूर्ण माहिती विचारली व दारु सोडण्याची प्रक्रिया सांगितली. फक्‍त १५ च दिवसात दारु सुटणार, यामुळे मी खूप खुश होतो, लगेचच मी अ‍ॅडमिट झालो.

दारु सोडतांना कुठलाही त्रास झाला नाही
संकल्पमधील वॉर्ड म्हणजे कुठेतरी आलिशान ठिकाणीच राहायला आलो आहे असे वाटले, येथे डॉक्टर्स तसेच समुपदेशकांनी माझी व्यवस्थीत दिनचर्या लावून दिली. सुरुवातीचे सहा दिवस सलाईन लावली तसेच शरिरातील संपूर्ण दारु बाहेर काढली. त्यानंतर इंजेक्शन्स, गोळ्या सुरु केल्या. यादरम्यान मला पुन्हा दारु पिण्याची इच्छा झाली नाही तसेच दारु पित नसल्याने कुठलाही त्रासही झाला नाही. याआधी दारु पिल्याशिवाय जेवण जात नसे मात्र आता तसे झाले नाही. अगदी तंदुरुस्त होवून मी घरी जात आहे.

औषधोपचाराबरोबरच मनोरंजनही
संकल्प केंद्राची विशेषत: मी नक्‍कीच सांगेल की, येथे दररोज १ तास डॉक्टर समुपदेशन करायचे, माझ्याशी एकदम मैत्रीपूर्ण संबंध त्यांचे निर्माण झाले. तसचे औषधोंपचाराबरोबरच कॅरम, चेस बोर्ड, टिव्ही अशा साधनांनी मनोरंजन देखील व्हायचे. १६ वर्षाची दारुची सवय १५ दिवसातच सुटली, ज्यांना खरोखरच दारु सोडवायची असेल त्यांनी नक्‍कीच संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्राला भेट द्यावी असे आवाहन बरा होवून घरी परतत असलेल्या सुनिलने केले.

Leave A Reply

Your email address will not be published.