सावधान: सर्दी- खोकल्यावर औषधी घेताय? ‘या’ औषधांवर बंदी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुम्ही देखील सर्दी खोकल्याने त्रस्त असाल तर ही बातमी नक्की वाचा. आजकाल सर्दी खोकला झाला तर डॉक्टरांकडे जाणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार गोळ्या- औषधी घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. म्हणून बऱ्याचदा बहुतांश लोक मनानेच औषध- गोळ्या घेतात. इतकेच काय तर लहान मुलांना देखील मनाने औषधी दिल्या जातात. मात्र लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचे निदर्शनास आल्याने भारताच्या सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने लहान मुलांसाठी असणाऱ्या सिरप कॉम्बिनेशनवर किंवा ॲण्टी कोल्ड कॉकटेल औषधांवर बंदी घातली आहे.

याबाबत चेतावनी 

याप्रकरणी सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने काढलेल्या नियमावलीनुसार ग्लैक्सोस्मिथक्लाईन या कंपनीचा टी- मिनिक ओरल ड्रॉप, ग्लेनमार्कचा एस्कोरिल फ्लू सिरप आणि आयपीसीए लॅबोरेटरीजचे सोल्विन कोल्ड सिरप यांच्यासह इतर काही कंपन्यांनाही याबाबत चेतावनी दिली आहे. ही सगळी औषध सर्दी, खोकला, फ्लू या आजारांमध्ये देण्यात येतात.

या आदेशात

पत्रात असेही म्हटले गेले आहे की, याविषयीच्या एका अभ्यासक समितीने क्लोरफेनिरामाइन मैलेट आयपी २ एमजी, फिनाइलफ्राइन एचसीआय आयपी ५ एमजी या औषधांना तर्कसंगत जाहीर केले होते. मात्र आता या औषधांमुळे लहान मुलांच्या तब्येतीवर विपरित परिणाम झाल्याची अनेक उदाहरणे समोर आल्याने त्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला असून ही औषधं ४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नयेत, असे सांगण्यात आले आहे. तसेच या कंपन्यांनी त्यांच्या औषधांच्या पाकिटांवरही याबाबतची ठळक माहिती द्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.