Wednesday, September 28, 2022

अलर्ट ! राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार ?; केंद्राने पाठवले पत्र

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले होते. दरम्यान देशात करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीत चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ८ टक्क्यांवर पोहोचले असून, महाराष्ट्रातही मंगळवारी दुप्पट रुग्णवाढ नोंदविण्यात आली़ आहे. रुग्णवाढीमुळे मुंबईत यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आह़े.

- Advertisement -

- Advertisement -

दिल्लीत सलग दोन दिवस करोना रुग्णांची संख्या प्रत्येकी ५०० नोंदवण्यात आली. दिल्लीत आठवडाभरात चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण तिपटीने वाढले आह़े. देशात गेल्या २४ तासांत १,१७४ रुग्ण आढळल़े. महाराष्ट्रातही सोमवारच्या तुलनेत मंगळवारी दुपटीहून अधिक म्हणजे १३७ रुग्ण आढळल़े, त्यात मुंबईतील सर्वाधिक ८५ रुग्णांचा समावेश आह़े. यामुळे मुंबई पालिका सतर्क झाली आह़े.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच त्यांनी पॉझिटिव्हिटी रेट 8 टक्क्यांच्या पुढे गेल्यानं अलर्ट राहण्याच्या व पंचसूत्रीचं पालन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत आरोग्य मंत्रालयाने योग्य खबरदारी घेऊन आवश्यक पावलं उचलण्याचा सल्ला राज्यांना दिला आहे. याशिवाय राज्यांनाही सतर्क राहण्याचा सूचना ही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जर पॉझिटिव्हिटी दर वाढला तर पुढील काही महिन्यात मास्क सक्तीचा निर्णय राज्य सरकार घेण्याचा अंदाज वर्तवला जातोय.

मुंबईमध्ये हवाई मार्गाने येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येत़े परंतु, रेल्वे किंवा अन्य मार्गाने येणाऱ्या नागरिकांचा शोध घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या विभागांमध्ये मुंबईबाहेरून व्यक्ती किंवा कुटुंबे वास्तव्यास येत आहेत, का याची पाहणी करण्याची सूचना प्रशासनाने विभाग कार्यालयांना दिली आहे.

या व्यक्तींना कोणतीही लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या तातडीने चाचण्या करण्याची सूचनाही प्रशासनाने दिली़. उपचारासाठी येणाऱ्या व्यक्तींना करोनासदृश्य लक्षणे आढळल्यास तातडीने आणि सक्तीने करोना चाचण्या करण्याच्या सूचना खासगी डॉक्टरांना द्याव्यात, असे आदेश पालिकेने विभाग कार्यालयांना दिले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील रुग्णसंख्येत काही अंशी वाढ झाली आह़े. रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमीच आहे. सध्या रुग्णालयात केवळ १२ रुग्ण दाखल आहेत.

दैनंदिन करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात येत असली तरी तज्ज्ञांच्या मतानुसार, सलग सुट्टय़ा आणि सण-उत्सवांमुळे नागरिक एकत्र येत असल्याने ही रुग्णवाढ दिसत आहे. मात्र, चौथ्या लाटेची सुरुवात झाली, असे लगेच म्हणता येणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आह़े.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या