मल्लिकार्जुन खर्गेंच्या विरोधात वक्तव्य भोवले ; माजी गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल

0

कलबुर्गी :- कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल येथील पोलिसांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

येथील अशोक नगर पोलीस ठाण्यात कॉंग्रेस कार्यकर्ता राजीव जाने यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुरुवारी एफआयआर नोंदवण्यात आला.

ज्ञानेंद्र यांच्यावर आयपीसीच्या कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर बदनामीकारक वक्तव्य करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि हा खटला शुक्रवारी शिवमोग्गा जिल्ह्यातील तीर्थहल्ली येथे हस्तांतरित केला जाईल, जिथे ही घटना घडली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी तिर्थहळ्ळी येथे झालेल्या आंदोलनादरम्यान भाजपच्या ज्येष्ठ आमदाराने खर्गे यांच्या वर्णाचा आणि ते ज्या प्रदेशातील आहेत त्याबद्दल आक्षेपार्ह टीका केली होती.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.