महागाईचा झटका ! CNG चे दर पुन्हा वाढले

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. जीवनावश्यक गोष्टींसह इतर वस्तूंच्या किमती देखील वाढल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यातच आणखी भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच वाढलेल्या सीएनजीच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत.

दिल्लीत सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या वाढलेल्या किमती आजपासून लागू होणार आहेत. पुण्यात सीएनजी दोन रुपयांनी महाग झाल्याने आता सीएनजीचे भाव प्रति किलो 80 रुपयांवर पोहोचले आहेत. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहे. या अगोदर पुण्यात सीएनजी दर 77.20 रुपये होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.