शेती घेण्यासाठी दोन लाख रुपये देण्यास नकार देणाऱ्या विवाहितेचा छळ

0

भडगाव :- तालुक्यातील निंभोरा येथील माहेर असलेल्या 26 वर्षीय विवाहितेला शेती घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावे या मागणीसाठी छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील निंभोरा येथील माहेर असलेल्या निर्मला सुनील बोरसे वय 26 यांचा विवाह सुनील बोरसे रा. वाघळी ता. चाळीसगाव यांच्याशी झाला होता. मात्र विवाह झाल्यापासून 20 मे 2022 ते २८ एप्रिल 2023 च्या दरम्यान पती सुनील बोरसे यांनी शेती घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत अशी मागणी केल्याने त्यास नकार दिल्याने आरोपी सुनील बोरसे ,सासरे अर्जुन बोरसे ,सासू आखाबाई बोरसे, जेठ गणेश बोरसे ,ननंद शोभाबाई भिल सर्व रा. वाघळी ता. चाळीसगाव यांनी शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन छळ केला. याप्रकरणी निर्मला बोरसे यांनी भडगाव पोलीस स्टेशनला ७ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास फिर्याद दिल्यावरून पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.