Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»राज्यात CBSE शाळांचा घोटाळा, लाखोंना विकले बोगस प्रमाणपत्र
    गुन्हे वार्ता

    राज्यात CBSE शाळांचा घोटाळा, लाखोंना विकले बोगस प्रमाणपत्र

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 11, 2023Updated:January 11, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यातील सीबीएसई शाळांचा (CBSE Schools) मोठा घोटाळा (Scam) उघडकीस आला आहे. राज्यात सीबीएसई शाळांना बनावट ना हरकत प्रमाणपत्र वाटप झाले आहे. हे प्रमाणपत्र लाखोंना विकले गेल्याची देखील उघड झाले आहे. याप्रकरणी ३ शाळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील ६६६ शाळांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. युडायस प्रणालीत ना हरकत प्रमाणपत्र अपलोड न करणाऱ्या शाळांना हे प्रमाणपत्र अपलोड करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

    या शाळांवर कारवाई

    पुण्यात सीबीएसई शाळांना राज्य शासनाचे बोगस ना हरकरत प्रमाणपत्र (एनओसी) विकणारी टोळी कार्यकरत होती. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून पोलिसांकडे तक्रार दाखल केली गेली. या तक्रारीनंतर पुण्यातील एम. पी. इंटरनॅशनल स्कुल एन्ड ज्युनियर कॉलेज, शिवाजीनगर , क्रिएटिव्ह एज्युकेशन पब्लिक स्कुल एन्ड ज्युनियर कॉलेज आणि नमो आर आय एम एस इंटरनॅशनल स्कुल एन्ड ज्युनियर कॉलेज या तीन शाळांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

    कसा केला प्रकार

    राज्य मंडळाव्यतीरिक्त इतर मंडळांच्या अभ्यासक्रमाशी संलग्न शाळांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची कारवाई राज्य सरकारकडून होते. परंतु पुण्यात काही शाळा व संस्था चालकांनी बनावट एनओसी प्रमाणपत्र मिळवले. या शाळांच्या एनओसीबाबतचे कोणतेही आदेश शासनाने काढले नव्हते. या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्रालयात असल्याचे उघड झाले आहे. मंत्रालयतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बनवाट सह्या व शिक्के वापरुन ही प्रमाणपत्र दिली गेली आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर शिक्षण विभागाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ही बनावट प्रमाणपत्र १२ लाख रुपयांना विकली गेली.

    CBSE Scam CBSE Scam In Maharashtra CBSE Schools Fake CBSE School Pune CBSE Scam
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif