आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. त्यानुसार, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी अभिभाषण करत अधिवेशनाची सुरूवात केली. या अभिभाषणात राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामांची, मदतनिधीची, तसेच वेगवेगळ्या योजना राबवणार असल्याची माहिती दिली.

राज्यातील शेतकऱ्याला २४ तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मिशन २०२५ योजनेची सुद्धा त्यांनी माहिती दिली. याशिवाय, युवकांसाठी गडचिरोली (Gadchiroli), गोंदियामध्ये (Gondia) प्रशिक्षण केंद्र तसेच राज्य सरकारने हाती घेतलेल्या मेट्रोच्या अनेक नव्या योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली.मराठा समाजासाठी राज्य सरकारच्या विशेष योजना, राज्यात ७५ हजार युवकांसाठी नोकरी भरत्या. जानेवारी 2023 मध्ये 1 लाख 35 हजारांच्या गुंतवणुकीचे करार, जुन्या पेन्शन योजनेत बदल, अशा राज्य सरकारच्या विविध कामांचा लेखाजोखा त्यांनी आपल्या अभिभाषणाने पटलावर ठेवला.

Leave A Reply

Your email address will not be published.