BSNL चा जबरदस्त प्लान ; ३६५ रुपयात वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज २ जीबी डाटा

0

नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे प्लान आणले आहेत. बीएसएनएलचा ३६५ रुपयांच्या प्लानमध्ये वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज २ जीबी देत आहे.

प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांशी तुलना केल्यास ३६५ रुपयांत १ वर्षाची वैधता असलेला सर्वात स्वस्त प्लान आहे. रिलायन्स जिओ १२९९ रुपये, एअरटेल १४९८ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमती सोबत वार्षिक प्लान ऑफर केला जातो. बीएसएनएलच्या ३६५ रुपयांच्या प्लानसंबंधी जाणून घ्या.

३६५ रुपयांचा वार्षिक प्लान

बीएसएनएलच्या ३६५ रुपयांचा वार्षीक प्रीपेड प्लान देशभरात सर्व सर्कलमध्ये उपलब्ध आहे. या प्लानमध्ये प्रत्येक नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग ऑफर दिली जाते. यासोबतच रोज २ जीबी डेटा मिळतो. २ जीबी डेटाची संपल्यानंतर युजर्संना 40Kbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा वापरता येवू शकतो. या शिवाय, ग्राहकांना रोज १०० फ्री एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये बीएसएनएल ट्यून्स सब्सक्रिप्शन फ्री ऑफर केले जाते. या फ्री सेवा केवळ ६० दिवसांसाठी आहेत. या प्लानची वैधता मात्र ३६५ दिवसांची आहे.

१० जानेवारीपर्यंत बीएसएनएलने व्हाइस कॉलिंग लिमिटला २५० मिनिटवर सिमित करण्यात आले होते. आता लिमिटला हटवले आहे. म्हणजेच बीएसएनएल प्लान मध्ये देशात विना एफयूपी लिमिटच्या अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर केली जाते.

बीएसएनएलकडे सर्वात स्वस्त वार्षिक प्रीपेड प्लान

वार्षिक वैधता सर्व प्लान पाहिल्यास सरकारी टेलिकॉम कंपनी सर्वात कमी किंमतीत ३६५ दिवसांची वैधता असलेला प्लान ऑफर करीत आहे. रिलायन्स जिओकडे १२९९ रुपयांत ३३६ दिवस, तर एअरटेलकडे ३६५ दिवसांच्या वैधतेसाठी १४९८ रुपयांचा प्लान आहे. परंतु, या प्लानमध्ये मिळणाऱ्या सर्व बेनिफिट पूर्ण वैधतेपर्यंत आहे. तर बीएसएनएलमध्ये मिळणारी फ्री ऑफर्स केवळ ६० दिवसांसाठी आहे.

३६५ रुपयांच्या प्लानमध्ये बीएसएनएलकडे १४९८ रुपायंचा प्रीपेड रिचार्ज आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, २४ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस फ्री मिळते. ३६५ आणि १४९८ रुपयांचे दोन्ही प्लान देशभरातील सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.