मंत्रिमंडळाची तीन वाजता महत्त्वाची बैठक; राज्यात कोणत्याही क्षणी होणार‘लॉकडाऊन’

0

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुक्रवारी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला होता. परंतु, रुग्णवाढ अशीच झपाट्याने वाढत राहिली तर डॉक्टर आणि नर्सेस कुठून उपलब्ध करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन पर्याय नसला तरी करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्याचं सरकारने निश्चित केल्याचं समजतं. त्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर आज दुपारी ३ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व मंत्री ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.  दरम्यान, करोनाची साखळी तोडण्यासाठी ठोस उपाय मिळत नसल्यानं राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचालीही सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल ४७ हजारहून अधिक रुग्ण आढळले. अशीच वाढ कायम राहिली तर १० ते १५ दिवसांत सर्व बेड्स आणि संसाधनं अपुरी पडू लागतील, असं स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. तसेच तज्ज्ञांशी बोलून लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ असही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या कालच्या एकंदरीत इशाऱ्यावरून राज्यात लॉकडाऊन होणार हे निश्चित मानलं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.