Breaking News : दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

0

मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी  समोर आली आहे. उद्या दहावीचा निकाल  लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. कालपासून सोशल मीडियावर आज दहावी निकाल लागणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर आज सकाळी शालेय शिक्षण मंत्रालयानं यावर स्पष्टिकरण देत तसंच दहावी निकाल याबाबत पूर्व कल्पना याची माहिती अधिकृत कळवण्यात येईल, असंही स्पष्ट केलं होतं. मात्र आता स्वतः वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.
उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल, असं ट्विट देखील गायकवाड यांनी केलं आहे.

महत्त्वाची सूचना: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!

 

Leave A Reply

Your email address will not be published.