गणेश कॉलनीत १६ वर्षीय मुलाचा विजेच्या ताराचा स्पर्श झाल्याने दुदैवी मृत्यू…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

गणेश कॉलनीत १६ वर्षीय मुलाचा मालकाच्या घरी साफसाफाई करत असताना विजेच्या तारावर पाय पडल्याने दुदैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला. सुनील संजय चव्हाण (मूळ रा. मन्यारखेडा) असे मयत मुलाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सुनाल चव्हाण हा जळगावातील बोहरा गल्लीतील बांधकामाच्या ठिकाणी आई-वडील व बहिण यांच्यासोबत वास्तव्याला आहे. बोहरा गल्लीतील फटाके दुकान मालकाने त्यांच्या गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करण्यासाठी सुनील चव्हाण आणि त्याचा मित्र सागर सुभाष शिंदे यांना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी पाठविले होते. दोघेजण घराची साफसफाई करत असताना सुनीलच्या पायाचा वीज तारेला स्पर्श झाला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.