जळगाव जिल्ह्यात चार बोगस डॉक्‍टरांवर कारवाई

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यात बोगस डॉक्‍टरांवर कारवाई केली आहे. मेहुणबारे (Mehunbare) परिसरातील विविध भागात चार बोगस डॉक्टरांवर (Bogus Doctor) कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वैद्यकिय पदवी नसताना रूग्‍णांच्‍या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्‍टरांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. या कारवाई अंतर्गत मेहूणबारे येथे सापडून आलेल्‍या बोगस (Doctor) डॉक्‍टरांवर डॉ. संदीप निकम, दिपक वाणी, विलास भोई, आर. आय. पाटील, डॉ.धीरज पाटील आदींनी ही कारवाई केली.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) परिसरातील पिलखोड येथे डॉ. संजय साळुंखे, डॉ. मृनाल टि. सरकार तर उपखेड येथील तन्मय दिपक पाठक, पोहरे येथे शहाजात कोमल मुजुंमदार या चौघांवर आज कारवाई करून चौघांना या पथकाने मेहुणबारे पोलिस (Police) ठाण्यात जमा केले. या कारवाईने मेहुणबारे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.