अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त भाजपातर्फे बाईक रॅली

0

जळगांव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज जळगाव येथे येणार असुन ‘युवा संवाद’ मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे. या निमित्त भाजपाचे नेते ना. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात दि.४ रोजी भाजपा कार्यालय पासून ते सागर पार्क बॅरिस्टर निकम चौक जळगाव येथे बाईक रॅली काढण्यात आली.

जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, केतकी पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, माजी महापौर सीमा भोळे, माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, जिल्हा सरचिटणीस, अरविंद देशमुख, महेश जोशी, नगरसेविका सुचिता हाडा, दीपमाला काळे, गायत्री राणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश पाटील, सरचिटणीस मयूर कापसे, जितेंद्र चौथे, सागर जाधव, गजानन वंजारी व पदाधिकारी तसेच मंडळ अध्यक्ष आघाडी अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.