बिपाशा बासूने दिली गुड न्यूज; बेबी बंपचा फोटो होतोय व्हायरल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अभिनेत्री बिपाशा बासूने   (Bipasha Basu) सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. बिपाशा लवकरचं गोंडस बाळाला जन्म देणार आहे. बिपाशाने तिच्या सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बिपाशासोबत पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हरही (Karan Singh Grover)  दिसत आहे. फोटोंमध्ये दोघेही प्रचंड आनंदी दिसत आहेत. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/ChT3SgaNdJF/?utm_source=ig_web_button_share_sheet

काही दिवसांपूर्वीच बिपाशाच्या गरोदरपणाची सोशल मीडियावर चर्चा होती. मात्र तिने किंवा करणने याबाबत कोणतीच पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केली नव्हती. आता दोघांनीही या खास फोटोशूटचे फोटो पोस्ट करत आनंदाची बातमी दिली आहे. बिपाशा आणि करणने एप्रिल 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या सहा वर्षांनंतर या दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

बिपाशाची पोस्ट

‘आमच्या आयुष्याच्या विविध छटांमध्ये एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा, एक नवीन प्रकाश रेखाटला गेला आहे. त्यामुळे आम्हाला पूर्वीपेक्षा थोडं अधिक पूर्णत्वाची भावना अनुभवायला मिळतेय. आम्ही या आयुष्याची सुरुवात वैयक्तिकरित्या केली आणि नंतर आम्ही एकमेकांना भेटलो. तेव्हापासून आम्ही दोघं या प्रवासात एकत्र आहोत. फक्त दोघांपुरतं हे प्रेम मर्यादित ठेवणं आम्हाला थोडं अयोग्य वाटलं. त्यामुळे आता आता लवकरच आम्ही दोघाचे तीन होऊ. आमचं बाळ लवकरच आमच्या या प्रवासाचा साथीदार होईल आणि आमचा द्विगुणीत करेल. तुम्हा सर्वांच्या बिनशर्त प्रेमाबद्दल, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद आणि ते नेहमीच आमचा एक भाग असतील,’ अशा शब्दांत बिपाशाने भावना व्यक्त केल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.