भुसावळ हादरले!; जुन्या वादातून माजी नगरसेवकासह एकाची गोळ्या झाडून हत्या

0

भुसावळ ;-  जुन्या वादातून अज्ञात हल्लेखोरांनी माजी नगरसेवकासह एका सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना शहरातील जुना सातारा रोडवरील मरी माता मंदिराजवळच्या पुलाजवळ बुधवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. यात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा 12 गोळ्या लागल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.. दरम्यान विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी बेधुंद गोळीबार करून त्यांनी भारत नगरात वीस ते बावीस राउंड हवेत फायर केले. पोलिसांनी वाल्मिक नगर व परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला असून दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आले.

घटनास्थळी जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप रणदिवे, बाजारपेठचे निरीक्षक गजानन पडघन यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,

शहरातील जुना सातारा भागातील मरीमाता मंदिर समोर भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले.

दरम्यान हल्ला झाल्यानंतर दोघांनाही पोलिसांनी तातडीने डॉ.राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात नेले. मात्र या हल्ल्यात बारसे आणि राखुंडे हे दोन्ही  उपचारापूर्वीच मयत झाले.

 

संतोष बारसे यांचे वडील मोहन पहेलवान यांच्यावरदेखील जुलै २०१५ मध्ये कन्या शाळेच्या मैदानाजवळ हल्ला झाला होता. त्यात मोहन पहेलवान यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्यावेळी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.