विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने बहरली जीपीएसची बाग

0

 पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भाऊसाहेब गुलाबराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी येथे आज विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. सप्तरंग उधळणारी आशयाने परिपूर्ण अशी रांगोळी रेखाटण्यात आली. सकाळी सुरुवातीलाच गेटवर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्राचार्यासह  सर्व शिक्षकांची टीम उभी राहून विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी चॉकलेट देऊन तसेच हाय-फाय, बुम, नमस्ते, प्रेमाची मिठी देऊन सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

अल्पावधीतच पाळधी परिसरात नावलौकिक प्राप्त असणारी शाळा म्हणजे भाऊसाहेब गुलाबराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या पहिल्याच दिवशी सर्वच पालकांनी उपस्थिती दर्शवत, शाळेचा परिसर गुलाबपुष्पा सारख्या टवटवीत बालगोपालांनी व पालकांनी बहरुन आला होता.

सदर कार्यक्रमाला व्यवस्थापन सदस्यांमधील शाळेतील सर्वांच्या आवडत्या माई म्हणजेच मायाबाई गुलाबराव पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. कंखरे यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर शिक्षकांच्या वतीने  हुसना पटेल मॅम यांनी विद्यार्थ्यांचे शब्द सुमनानी स्वागत केले. अनिता पाटील यांनी शालेय किटचे स्पष्टीकरण दिले.

अतिशय नावीन्यपूर्ण पद्धतीने सर्व शिक्षकांनी आपला परिचय सदर पालकसभेत करून दिला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, बॅग इत्यादी शालेय किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पन्नास संगणक असणाऱ्या सुसज्ज अशा संगणक कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमात पालकांना संबोधित करताना शाळेचे प्राचार्य सचिन पाटील सर यांनी भारतीय शिक्षण पद्धती त्यात होत असलेले अमुलाग्र बदल, नवीन शैक्षणिक धोरण, काळानुरूप हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क करण्याची गरज, नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळेची असणारी नवी थीम Let’s go around the world याबाबत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी व्यवस्थापन मंडळातील सदस्य सर्वांच्या आवडत्या माई मायाताई गुलाबराव पाटील यांचे आशीर्वाद सर्व बालगोपाळांना व शिक्षकांना लाभले आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक करत असलेल्या कामाचं त्यांनी तोंडभरून कौतुक केले.

हसत खेळत पद्धतीने विद्यार्थ्यांचे केलेले स्वागत, विद्यार्थ्यांच्या यशाचा वाढत जाणारा आलेख, अतिशय नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकवणारे शिक्षक, आपल्या सर्वोत्कृष्ट अशा वकृत्व व्यवस्थापनासाठी  ओळखले जाणारे प्राचार्य, पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील ,जिल्हा परिषद सदस्य  प्रतापराव पाटील, विक्रमराव पाटील यांचे अनमोल असे मार्गदर्शन या बाबी जीपीएसच्या भरघोस यशाच्या मानबिंदू आहेत.

गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत व पालकांच्या सहकार्याने शिक्षण क्षेत्राचा हिमालय आम्ही नक्की सर करू असा आशावाद प्राचार्य सचिन पाटील यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन राकेश धनगर यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीपीएस परिवारातील सर्व सदस्यांनी आणि मोलाचे सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.