अश्लीलतेचा कळस : तरुणीला विवस्त्र नाचवले, व्हिडीओ व्हायरल

0

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भंडारा जिल्ह्यातून अश्लीलतेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. दिवाळीनंतर  भंडारामधील अनेक गावांत मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी या गावात नृत्य करताना तरुणी चक्क विवस्त्र झाली. विवस्त्र होत नृत्य करत असताना काही टवाळखोरांनी तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती स्टेजच्या खाली कोसळली.  या घटनेचा मात्र व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

तरुणी विवस्त्र होताच.. 

मिळालेल्या माहितीनुसार, 18 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच हा प्रकार झाला. या नृत्य कार्यक्रमासाठी नागपूरहून डान्स हंगामा पार्टीच्या कार्यक्रमासाठी नागपूरहून डान्स हंगामा पार्टीच्या नृत्यांगनांना बोलावण्यात आले होते. रात्री डान्स हंगामाचा कार्यक्रम सुरू झाला. सुरवातीला लावण्या सुरू होत्या. मात्र रात्री 2 वाजेनंतर अश्लीलतेचे प्रकार सुरू झाले. या उत्सवात नृत्य करणाऱ्या एका तरुणीने एक एक करीत अंगावरील वस्त्र काढण्यास सुरूवात केले आणि क्षणातच ती विवस्त्र झाली. तरुणीने विवस्त्र अवस्थेतच नृत्य करण्यास सुरुवात केली. तरुणी विवस्त्र होताच काही टवाळखोर तरुणांनी तरुणीची छेड काढण्यास सुरवात केली. काहींनी तरुणीला स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला. काही वेळाने डान्स करणारे तरुण तरुणी अचानक तोल जाऊन स्टेज खाली पडले.

आयोजकांसह पोलिसांवरही गुन्हा

18 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आता समोर आला असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कार्यक्रमाचे आयोजक आणि आर. के. डान्स हांगामा ग्रुपच्या 5 जणांविरुद्ध कलम 354, 354 ब, 294, 509 भांदवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच  कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राकेशसिंग सोलंकी (हेड कॉन्स्टेबल) व राहुल परतेती (पोलीस शिपाई) दोन पोलिसांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.