भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण; न्यायालयाचा मोठा निर्णय

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदोर न्यायालयाने आरोपी सेवक, चालक आणि केअर टेकरला दोषी ठरवलं आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

भय्यू महाराज यांनी २०१८ मध्ये स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती. इंदोर न्यायालयाने भय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी आरोपींना दोषी ठरवलं असलं तरी अद्याप दोषींना शिक्षा सुनावलेली नाही. त्यामुळे या प्रकरणी न्यायालय काय शिक्षा सुनावते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकं प्रकरण काय ?

अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी २०१८ मध्ये स्वतःजवळ असलेल्या परवानाधारक पिस्तुलने गोळ्या झाडत आत्महत्या केली होती. सुरुवातीला कौटुंबिक कलह किंवा नैराश्य या दोन कारणांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात आली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी काही महिने आधीच त्यांनी सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यातून आपण आता निवृत्त होत आहोत, असे जाहीर केले होते.

या प्रकरणी इंदूर पोलिसांनी ३ जणांना अटक केलं होतं. यात एका तरुणीचाही समावेश होता. तसेच भय्यू महाराज यांचा सेवक विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांना देखील अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या तरुणीने भय्यू महाराज यांच्याकडून लाखो रुपये उकळले, असा आरोप झाला होता.

गेल्या वर्षी जून महिन्यात भय्यू महाराज यांनी इंदूरमध्ये आत्महत्या केली होती. भय्यू महाराज यांनी राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. व्यक्तिगत तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगितले जात होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता.

भय्यूजी महाराज कोण होते?

देशभरातील विविध राज्यांमधील राजकीय नेते व चित्रपट अभिनेते भय्यू महाराज यांचे अनुयायी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील हे त्यांच्याकडे चर्चेसाठी जात असत. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी मोठे काम केले. मराठवाड्यात त्यांच्या संस्थेने ५०० तलाव खोदले आहेत. वृक्षारोपण चळवळीला त्यांनी मोठी चालना दिली. लोकांकडून ते काहीही भेटवस्तू स्वीकारत नसत. त्याऐवजी एक झाड लावा, असे ते सांगत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.