भडगावच्या सुपुत्राने जिंकले तब्बल साडे बारा लाख, जिंकलेल्या रकमेतून भडगावात उभारणार अभ्यासिका

0

भडगाव : येथील रहिवासी व धुळे जिल्हयातील शिरपुर, येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले मुस्तफा मिर्झा यांनी एका खासगी दूरचित्रवाणीवरील सामान्य ज्ञानावर आधारित “कोण होणार करोडपती” या कार्यक्रमात तब्बल साडे बारा लाख रुपये जिंकले. है पैसे ते भडगाव शहरातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांसाठी अभ्यासिका उभारणीच्या कामासाठी खर्च करण्याचा संकल्प त्यांनी बक्षिस घेताना व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान मुस्तफा मिर्झा यांना विविध विषयावर – प्रश्न विचारण्यात आले. आत्मविश्वासाने प्रत्येक प्रश्नाला सामोरे जात त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर दिले. कार्यक्रमा दरम्यान त्यांनी सांगितले की, मी पी. एस. आय. होण्यापूर्वी जळगाव येथे अभ्यासिकेत जायचो. अभ्यास करताना माझा मोबाईल नेहमी बंद असायचा. ज्या दिवशी वडिलांचे निधन झाले, त्यादिवशी नेहमीप्रमाणे मोबाईल बंद असल्याने वडिलांना इच्छा असूनही ते माझ्याशी बोलू शकले नाही. ही खेत कायम मनात आहे. त्यामुळे अभ्यासाकरिता युवकांना भडगाव सोडून बाहेरगावी जाण्याची वेळ भविष्यात येऊ नये, यासाठी मी जिंकलेल्या रकमेतून “अभ्यासिका” उभारणार आहे. कार्यक्रमादरम्यान त्यांनी सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांना विनंती केली की, कोविडच्या काळात पोलिस दलाने जीव धोक्यात घालून काम केले आहे. तेव्हा आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व पोलिस दलाला एक सॅल्यूट दयावा, त्यांचे आभार मानाचे खेडेकर यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन ‘सॅल्यूट’ही ठोकला.
मुस्तफा मिर्झा हे अतिशय सामान्य परिस्थितीतून अभ्यास, जिद्द व चिकाटी या गुणांनी पी.एस.आय या पदावर पोहोचले आहेत. त्यांचे एक बंधू कालवा निरीक्षक तर दुसरे पोलिस आहेत.
‘मुस्तफा मिर्झा यांच्या यशाबद्द्द‌ल कौतुक करणारे होर्डिस गावात ठिकठिकाणी लावलेले दिसून आले.तर सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशाबद्दल अनेक मान्यवरांनी, सामान्य भडगावकरांनी त्यांचा सत्कार व कौतुक केले. मुस्तफा मिर्झा यांचे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण अँग्लो उर्दू हायस्कूल येथे, तर अकरावी-बारावीचे शिक्षण मराठी माध्यमातून लाडकूबाई ज्युनिअर कॉलेज व महाविद्यालय शिक्षण सौ. र. ना. देशमुख महाविद्यालयातून झाले. आहे. एम.ए. पर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले असून पी. एच. डीची ही तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.