सरपंच पदी अशोक पाटील यांची बिनविरोध निवड

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

तालुक्यातील लोणपिराचे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अशोक रामभाऊ पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रापंचायतीच्या पदाधिकार्यांमार्फत नवनिर्वाचीत सरपंच अशोक पाटील यांचा पुष्पहार, पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन कजगाव मंडळ अधिकारी आर. पी शेजवळ यांनी निवडणुकीचे कामकाज पाहीले. त्यांना ग्रामसेवक धनराज पाटील यांनी सहकार्य केले. सुनंदा पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी ही निवडणुक घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विठाबाई शिवराम पाटील,प्रमिला पंडीत माळी, सुनंदा गिरधर पाटील, कविता सुदाम पवार, जिभाऊ अर्जुन पाटील, दिगंबर मारोती खवले यांचेसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी हजर होते. तसेच भास्कर पाटील, सुरेश पाटील, पंडीत माळी,राजेंद्र पाटील, किशोर माळी,रावसाहूब पाटील, भगवान पाटील,संभाजी पाटील, बाबाजी पाटील, नगराज पाटील, भारत पाटील, भावलाल पाटील यांचेसह नागरीकांची उपस्थिती होती. यानंतर भडगावचे पञकार अशोकबापु परदेशी यांनीही नवनिर्वाचीत सरपंच अशोक पाटील यांचा पुष्पगुच्छ देउन सत्कार केला.

Leave A Reply

Your email address will not be published.