धक्कादायक; शालकाला फोनवर सांगितले… आणि धावत्या रेल्वे समोर उडी घेतली…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शेतातील हिस्से वाटणीवरून रागाच्या भरात आपल्या शालकाला सांगून कासमवाडीतील एका रिक्षा चालकाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, संजय चावदस सपकाळे (५५), रा. कुवारखेडा ता. जळगाव ह.मु. कासमवाडी जळगाव हे पत्नी व मुलीसह येथे वास्तव्याला होते. रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या शेतातील हिस्से वाटणीवरून पाच भावांमध्ये वाद सुरू होता. इतर भावांना शेतातील वाटेहिस्से देण्यात आले होते. परंतु संजय सपकाळे यांना शेतातील कुठलाही हिस्सा देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे माझा हिस्सा मिळावा या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून ते भावांशी भांडण होते.

दरम्‍यान मंगळवारी २३ मे सकाळी शेतीच्या हिस्से वाटेवरून पुन्‍हा वाद झाला. त्यावेळी भाऊ यांनी शेती देण्यास नकार केला. या संतापाच्या भरात संजय सपकाळे यांनी आसोदा रेल्वे फाट्याजवळ रिक्षा बाजूला लावून शालक गजानन आधार सोनवणे यांना फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगत धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी आसोदा रेल्वेगेटजवळ धाव घेतली होती. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रघुनाथ महाजन यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला.

Leave A Reply

Your email address will not be published.