अवैध वृक्ष तोडीने केला कहर, वनविभागाचे दुर्लक्ष कार्यवाहीची मागणी

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांना लिंब, आंबे, चिंच, बाभुळ यासह सर्वच हिरव्यागार डेरेदार वृक्षांची बेसुमार वृक्षतोड होत आहे. अवैध वृक्ष तोडीने कहर केला आहे. यावर प्रशासनाचा कोणताच अंकुश नाही .वनविभागासह प्रशासन सुस्त असुन याकडे वनविभागाचेही सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीपेक्षा अधिक होणारी वृक्षतोड पर्यावरणाला घातक ठरणारी आहे. वृक्षतोड कडे दुर्लक्ष करण्या ऐवजी वन विभागाने कार्यवाही करण्याची नितांत गरज आहे. कोरोना व बांधकामे वीटभट्टी तिन्ही कामे सुरू असल्याने कोरोनातील व्यक्तींना जळतन व बांधकाम क्षेत्रातील इमारतींना दरवाजे चौकट व विट भट्टीला डेरेदार वृक्ष आदी कामा साठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड सुरू आहे. वृक्षतोड मुळे ऑक्सिजनचा समतोल ही बिघडल्यामुळे अनेक लोक आजारी पडत आहे.

भडगाव तालुक्यात शेत माळरानात, गिरणा काठावर लिंब, आंबे, चिंच, बाभुळ यासह उंच डेरेदार हिरवे वृक्ष मोठया प्रमाणात होती. मात्र विना परवाना हिरव्या जिवंत रसाची झाडे तोडण्याचा जणु अवैध वृक्ष तोड करणार्यांनी धुमधडाकाच लावला आहे. विविध हिरव्यागार नटलेल्या वृक्षांची खुलेआम कत्तल होत असल्याने सारे माळरान उजाड होतांना दिसत आहे.शहरासह तालुक्यातुन रस्त्यावरुन भर दिवसा ट्रॉली वर फट टाकून विनापरवाना ट्रॅक्टरने छुप्या मार्गाने अवैध लाकडे वाहतुक होतांना दिसत आहे. शेकडो मोठे डेरेदार वृक्ष तोड झाल्याचे दिसून येत आहे. तोड झालेल्या वृक्षांची वन व महसूल विभागाच्या विना परवानगी वाहतूक होत आहे. पहाटे व दुपारी सायंकाळी शांततेचा फायदा घेत शहरातुन चोरटया मार्गाने वाहतूक होतांना दिसते. मात्र दुपारी या चोरट्या वृक्षतोडीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. ही तोडलेली झाडाची लाकडे ट्रॅक्टरने शहरातील स्वॉ मिलवर व विट भट्टी येथे आणली जातात. मग या स्वा मिलवर व विट भट्टी वर एवढी लाकडे येतात कुठुन?

तोडलेल्या वृक्षांची संख्या पाहता तालुका प्रशासनाने सामुहिक कार्यवाही करणे अत्यावश्यक झाले आहे. प्रशासनाकडुन अवैध वृक्ष तोडी करणार्यांवर वा ट्रॅक्टरने अवैधरित्या लाकडे वाहतुक करणार्यांना फोफावले आहे. नेमके कुठे पाणी मुरत आहे? अशांवर कार्यवाही का होत नाही? असा संतप्त प्रश्न वनप्रेमी मंडळीतुन उपस्थितीत होत आहे. भडगाव तालुक्यात अवैध वृक्ष तोडी करणार्या टोळया कार्यरत आहेत. अनेक लाकडांचे व्यापारी आहेत. इलेट्रीक हत्याराने लाकडांची कटाई होतांना दिसते. वनविभागासह प्रशासनाने संबंधितांवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा. अशी नागरीकांची अपेक्षा आहे. भडगाव तालुक्यात शासनाकडून दरवर्षी मोठया प्रमाणात विविध वृक्षांचे वृक्ष लागवड केली जाते. शासन म्हणते वृक्ष लावा, वृक्ष जगवा. यावर शासन लाखो रुपये खर्च करते. दुसरीकडे सर्रास हिरव्या डेरेदार झाडांची अवैध वृक्ष तोड होतांना दिसते. मग याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा संतप्त प्रश्न उपस्थित होतांना दिसत आहे. तरी भडगाव तालुक्यात होणाऱ्या अवैध वृक्ष तोडीवर आळा बसवावा. पर्यावरणाचा होणारा र्हास रोखावा. अशी मागणी भडगाव शहरासह तालुक्यातील वृक्षप्रेमी मंडळीतुन होतांना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.