भडगावात ४ जानेवारीला जयगुरूदेव परीवारातर्फे सत्संग

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शाकाहारी व व्यसनमुक्तीच्या प्रचारासाठी प.पु. गुरूदेवजी महाराज आश्रम मथुरा यांच्यावतीने पुज्य पंकजजी महाराज यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ४ जानेवारीला सकाळी ११ वाजता पाचोरा रस्त्यावरील शासकीय आयटीआयच्या समोर संत्संग व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

प.पु. जयगुरुदेवजी महाराजांचे उत्तराधिकारी, मथुरा आश्रम (उ.प्र.) यांचे राष्ट्रीय अध्यक्ष पुज्य पंकजजी महाराज यांचे शाकाहारी, सदाचारी, नशामुक्त आणि भजनानंदी करण्यासाठी सत्संगाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. बाबा जयगुरुदेवजी महाराजांचा १८ मे २०१२ रोजी मृत्यु झाला. त्यांचे उत्तराधिकारी पुज्य पंकजजी यांच्या कार्याला पुढे नेत आहे. शाकाहार, सदाचार, नशामुक्त जिवन व चांगल्या समाजाची निर्मिती प्रेम, सांप्रादायीक सामज्यास व मानव सेवेचे संदेश घेवुन जगभरात यात्रा करून प्रसार व प्रचार करीत आहे.

त्यांची ८२ दिवसीय यात्रा हरयाणा, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश व इतर राज्यातुन महाराष्ट्रात डिसेंबर – जानेवारी महिन्यात ७६ दिवसाच्या दौऱ्यावर आहे. मानव धर्म, मानव कार्य काय आहे? जिवंतपणी भगवतांची प्राप्ती कशी होते ? मानव शरीराचे सार्थक कसे होईल ? कोठुन आले व मेल्यानंतर कोठे ? आदि प्रश्नांवर सत्संगात प्रवचन केले जाते. सत्संगाचा सहकुटूंब सहपरिवार लाभ घ्यावा असे आवाहन जय गुरू देव परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.