धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण देऊ नये एकलव्य संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

धनगर समाजाला एस. टी. प्रवर्गातून आरक्षण देऊ नये यासाठी आज भडगाव तहसीलदारांना एकलव्य संघटनेने निवेदन दिले आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजाने आम्हाला एस. टी. प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या करिता आंदोलन, उपोषण उभारले आहे. त्यामुळे त्यांच्या अशा मागणीमुळे मुळ आदिवासी विरुद्ध धनगर समाज यामध्ये भविष्यामध्ये जातीय तेड निर्माण होवु शकतो. तसेच आदिवासी समाज मागील ७५ वर्षामध्ये आता तरी कुठे समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहे व आपणास संविधानाने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे आरक्षण दिलेले आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यात पाल टाकून राहणारा, पोटासाठी गावोगावी भटकंती करणारा आजही मुख्य प्रवाहापासून दूर असलेला व आपली संस्कृती जोपासणारा समाज याला स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर त्याच्या अधिकाराबद्दल कुठेतरी माहिती होत असतांना यामध्ये काही लोकांनी धनगर यांना ST (आदिवासी) च्या प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यात यावे या करिता उपोषण आंदोलन करीत आहे. तसेच खान्देशातील SBC प्रवर्गात येणारा टोकरे कोळी, महादेव कोळी, समाज तो देखील आदिवासी जमातीचे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आंदोलन करतोय त्यांना सुध्दा समाविष्ट करु नये. फक्त धनगर या एकाच जातीसाठी ३.५% आरक्षण देण्यात आलेले असतानां एस. टी प्रवर्गात आरक्षण मागण्यांसाठी उपोषण तसेच रास्ता रोको करणे योग्य नाही हे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे षढयंत्र आहे. तसेच या आदिवासी समाजामध्ये ४८ अनुसूचित जमातीचा समाविष्ट आहे. यामुळे हा आदिवासी समाजावर अन्याय होणार आहे. आशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनावर जळगाव जिल्हा अध्यक्ष संजय सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे, तालुकाध्यक्ष दशरथ मोरे, दादाभाऊ बहिरम, विनोद मोरे, मुरलीधर मोरे, किरण मोरे, कृष्णा मालचे, दत्तू मोरे, पोलाद गायकवाड, देवीदास मोरे, आदींचा स्वाक्षऱ्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.