शेतातील चाऱ्याच्या कुट्टीत लपलेल्या आठ फुटी अजगराला शिताफीने पकडुन नैसर्गिक अधिवासात सोडले

सर्पमित्र विजय कंडारे यांनी दिले अजगराला जिवदान

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील वलवाडी येथे लपलेल्या आठ फुटी अजगराला शेतातील चाऱ्याच्या कुट्टीमधे लपलेल्या अजगराला शिताफीने पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. सर्पमित्र विजय कंडारे व त्याच्या सहकाऱ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

भडगाव तालुक्यातील वलवाडी परिसरात भला मोठा अजगर निघाल्याची माहिती सर्पमित्र विजय कंडारे यांना मिळाल्यानंतर तात्काळ वलवाडी येथे पोहचले. यावेळी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या परिसरात असलेल्या अजगराला शिताफीने पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. हा अजगर सुमारे आठ फूट लांबीचा असल्याचे विजय कंडारे यांने सांगितले.

शेतीचे नुकसान करणाऱ्या उंदरांना फस्त करण्याचे काम अजगारासारखे साप करतात. मात्र, आपल्याला सापांबाबत आवश्यक ते ज्ञान नसल्याने साप दिसला रे दिसला की त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला जातो. साप हा सरपटणारा प्राणी आहे. माणसाची चाहूल लागली तरी साप पळून जातो किंवा कुठेतरी लपून बसतो. मात्र, आपण त्याचा पाठलाग करून किंवा त्याला शोधून ठार मारतो. मात्र साप निघाला तर त्याला मारू नका, सर्पमित्रांना पाचारण करा, तोपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवा, सर्पमित्र आल्यावर सापाला शिताफीने पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडतील त्यामुळे सापाला मारणे टाळा, असे आवाहन सर्पमित्र विजय कंडारे यांनी केले आहे. अजगराला पकडण्याच्या मोहिमेत वनरक्षक मुकेश बोरसे, वानखेडे, रवि पाटील, हर्षल भदाणे आदि सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.