भडगाव येथे इ ९ वी च्या विद्यार्थ्यांनी परिपाठात सादर केले भारतीय संस्कृतीचे दर्शन

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज दिनांक १२ आॅगस्ट २०२३ शनिवार रोजी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित लाडकूबाई विद्या मंदिर व दादासाहेब सु.मा. पाटील कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथे, दर शनिवारी वेगवेगळ्या वर्गाचे तुकडी निहाय विद्यार्थी परिपाठ सादर करतात. आजच्या परिपाठाचे चौथे पुष्प इ ९ वी (क) च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर रित्या व उत्साहाने गुंफले.

सदर परिपाठात सुविचार, दिनविशेष, ठळक बातम्या, बोधकथा, प्रश्न मंजुषा, पोवाडा, भारतीय स्वातंत्र्याचा व क्रांतीचा गौरव करणारे विविध गिते, भाषणे आणि संपुर्ण परिपाठाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी सादर केलेले इंडियन कल्चर ड्रामा व इंडियन आर्मी चा ड्रामा अशा विविध कलाकृती यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात सादर केले. सूत्रसंचालन वेदीका अहिरे व पुनम परदेशी यांनी केले. वर्गशिक्षक दिपक भोसले यांचे सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

सदर प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या वैशाली पाटील, उपप्राचार्य एस पी पाटील, पर्यवेक्षक एन जी पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर, कर्मचारी, बंधु-भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सादरीकरणाचे विद्यालयाच्या प्राचार्या वैशाली पाटील यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.