स्व.बापुजी युवा फाऊंडेशन तर्फे लोकमान्य टिळक जयंती निमित्त शासकीय कार्यालयांना शिवराज्याभिषेक प्रतिमा भेट

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्त त्यांचा इ.स.१८९५ मधील शिवजयंती उत्सवाचा आदर्श मनात ठेऊन भडगाव येथील स्व.बापुजी युवा फाऊंडेशनचे संस्थापक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लखीचंद पाटील व भडगाव न. प. च्या मा.नगरसेविका समिक्षा लखीचंद पाटील यांच्या संकल्पनेतून आज स्व.बापुजी युवा फाऊंडेशन तर्फे भडगाव शहरातील नगरपरिषद कार्यालय, तहसिल कार्यालय, दिवाणी न्यायालय कोर्ट, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती कार्यालय, कृषी विभाग कार्यालय, महावितरण कार्यालय, शेतकीसंघ कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, नगरपरिषद अभ्यासिका या सर्व भडगाव शहरातील शासकीय कार्यालयांना छ्त्रपती शिवाजी महाराजांची शिवराज्याभिषेक प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी सर्व शासकीय विविध विभागीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फाऊंडेशन तर्फे आता पर्यंत राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी स्व.बापुजी युवा फाऊंडेशनचे सर्व संचालक मंडळ व सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.