लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे अभिनव उपक्रम घेण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी या उद्देशाने लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक घेऊन वर्ग मंत्री निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचा सुरेख अनुभव मिळाला. मतदान दिनांक 25 जुलै 2023 वार-मंगळवार. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून ऋषिकेश प्रवीण पाटील यांनी काम पाहिले. मतदान अधिकारी म्हणून उर्वी हरिचंद्र पाटील,ज्ञानेश अरूण पाटील, पवन संदीप पाटील यांनी काम पाहिले. बुथ क्रमांक 1 एकूण मतदान 38, प्रत्यक्षात झालेले मतदान 29, मतदान टक्केवारी 76.31 निवडणुकीच्या रिंगणात एकूण पाच उमेदवार होते. मानसी गणेश पाटील(5), मनस्वी अभिजीत सिसोदे (5), तेजल संदीप भोई(6), निर्भय भास्कर तायडे(2), ओम निलेश तिवारी(11). वरील उमेदवारांपैकी ओम निलेश तिवारी हा सर्वाधिक मतांनी विजयी झाला. ओमची वर्ग मंत्री म्हणून निवड जाहीर करण्यात आली. शाळेच्या वतीने त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. सदर मतदान प्रक्रियेसाठी वर्गशिक्षक अनंत हिरे यांनी फलक लेखन, मतदान प्रक्रिया तयारी करणे इत्यादी प्रकारे विशेष परिश्रम घेतले. शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांनी निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. भारतीय लोकशाही प्रक्रियेविषयी माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.