जिल्ह्यातील ७६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या

0

जळगाव : वैद्यकीय किंवा कौटुंबीक कारणावरुन जिल्हा पोलीस दलातील ७६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. तर सहा कर्मचाऱ्यांच्या – बदलीपात्र कर्मचाऱ्यांना स्थगिती दिली आहे.

याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मंगळवारी रात्री उशिरा काढले. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातील बदल्यांचे सत्र – सुरु आहे.

काही महिन्यांपुर्वी जिल्हा पोलीस दलातील – कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी – विनंती बदलीचे आदेश प्रलंबितच होते. कौटुंबिक किंवा वैद्यकीय कारणास्तव जिल्हा पोलीस दलातील – ७६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. तर सहा जणांच्या बदल्यांना स्थगिती – देण्यात आली आहे. यामध्ये पोलीस शिपाई ते सहाय्यक फौजदारापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांची विनंती बदली करण्यात आली असून याबाबतचे आदेश मंगळवारी रात्री पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.