बदलापूरची पोरं अभ्यासात आणि खेळातही हुश्शार!

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

बदलापूर : महामुंबईची ‘सॅटेलाईट सिटी’ म्हणून ओळख बनलेल्या बदलापूरमधील विद्यार्थी शिक्षणक्षेत्रात ताऱ्यांसारखे तळपत आहेत. २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठीच्या जेईई अॅडव्हान्स प्रवेश परीक्षेत तब्बल २५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पात्र ठरले, तर एका विद्यार्थ्याने ‘नीट’ परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे, बदलापूरमधील पोदार ब्रायो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बदलापूरकरांना अभिमान वाटेल अशी ही कामगिरी केली आहे.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सर्वोत्तम व्हावी यासाठी पारंपरिक तसंच नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धतीने विद्यार्थ्यांना घडवण्यावर पोदार ब्रायो इंटरनॅशनल स्कूल भर देतं. आयआयटी- जेईईसह (जाॅइंट एन्ट्रन्स टेस्ट) ही शाळा विद्यार्थ्यांकडून नॅशनल सायन्स आॅलिम्पियाड, नॅशनल स्टॅंडर्ड एक्झामिनेशन इन ज्युनिअर सायन्स, होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा, चित्रकला इलिमेंटरी आणि इंटरमिडिएट परीक्षा, स्पेलबी इंटरनॅशनल, नॅशनल अॅस्ट्रोनाॅमी अॅंड सायन्स आॅलिम्पियाड, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन या परीक्षांचीही तयारी करुन घेते.

“विद्यार्थ्यांच्या अभ्यास-परीक्षाविषयक शंकांचं निरसन करण्यासाठी विशेष कक्ष, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन आम्ही उपलब्ध करुन दिलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय आणि शाळा यांमधील बळकट नातं महत्वाचं ठरतं असा आमचा विश्वास आहे”, असं मत पोदार ब्रायो इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी सिंग यांनी सांगितलं. २०१५पासून शाळेच्या २००हून अधिक विद्यार्थ्यांनी जिल्हा तसंच राष्ट्रीय पातळवरील क्रीडा स्पर्धांमध्ये विविध बक्षीसं तसंच पारितोषिकं मिळवली आहेत. “करोना संकटकाळात शाळा फी कमी करण्याबाबत राज्य शासनाकडून कोणतीही सक्ती करण्यात आली नव्हती, तरी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, पालकांच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचा करुन शाळेच्या फीमध्ये १५ टक्के सवलत दिली”, अशी माहितीही मुख्याध्यापिका रश्मी सिंग यांनी दिली.

“विद्यार्थ्यांमध्ये योग्य वयातच सामाजिक भान निर्माण व्हावं यासाठी अनाथालयं, वृद्धाश्रम, दत्तक केंद्र आदी ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या भेटी घडवून आणल्या जातात. गरजूंसाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दानयज्ञ राबवून वंचितांसाठी विविध वस्तू उपलब्ध करुन दिल्यामुळे विद्यार्थ्यांनाही आपली स्वत:ची सामाजिक जबाबदारी समजते आणि एक नागरिक म्हणून ते अधिक समृद्ध होतात” असंही पोदार ब्रायो इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी सिंग यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.