जळगाव जिल्ह्यात आयुष्मान भव मोहिमेचा शुभारंभ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी ‘आयुष्यमान भव’ या योजनेविषयी आज पत्रकार परिषद घेतली. आयुष्मान भव ही केंद्र शासनाची अत्यंत महत्वकांक्षी मोहीम आहे. ही मोहीम १३ सप्टेंबर २०२३ पासून ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ १३ सप्टेंबर २०२३ रोजी जळगाव जिल्ह्यात पुर्ण आरोग्य संस्थेमध्ये करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये खालील योजनाचा समावेश असल्याची माहिती दिली. यामध्ये आयुष्मान आपल्या दारी 3.0, आयुष्मान मेळावा, आयुष्मान सभा, अंगणवाडी शाळेतील मुलांची तपासणी या योजनांचा समावेश आहे.

आयुष्मान आपल्या दारी 3.0. या मध्ये सर्व आशा आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड काढून देण्यासाठी सहकार्य करणार आहे. या मध्ये आयुष्मान कार्ड से २१,८४,८३९ उद्दिष्टे आहे. त्यापैकी ४,९१,६७४ कार्ड काढण्यात आलेले आहे. तसेच आभा कार्ड काढण्याकरीता ४२,२९,००० चे उद्दिष्टे आहे त्यापैकी १२,२०,००० कार्ड काढण्यात आलेले आहे.

आयुष्मान मेळावा

या उपक्रमात वेगवेगळ्या शिबिराचे आयोजन केले जाणार आहेत. जसे रक्तदान शिबिर, शत्रक्रिया शिबिर आयोजित केले जाणार आहेत. यात First Week असंसर्जन्य रोग निदान शिबीर, Second Week संसर्जन्य रोग निदान शिबीर, Third Week गरोदर माता व बालकांची तपासणी, Fourth Week नाक, कान, खास व नेत्र रोग रुग्णांची तपसणी करण्यात येणार आहे.

आयुष्यमान  सभा

२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने गाव पातळीवर आयुष्यमान सभेचे आयोजन केले जाणार असून सर्व आजाराची माहिती देणे तसेच आयुष्मान कार्ड बाबत जनजागृती करणे हा उद्देश आहे.

अंगणवाडी व शाळेतील मुलांची तपासणी

यामध्ये ० ते १८ वयोगटातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून त्यामध्ये आजारी आढळून आलेल्या बालकांना उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यामध्ये ९८८१६३ बालकांची तपासणी केल्या जाणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.