लोकशाही विशेष लेख
हिताहितं सुखं दुःख मायुस्तस्य हिताहितम
मानंच तस्य यात्रोक्तमायुर्वेद:सउच्चते
(चरक सूत्र : १.४१)
अर्थ: हितायु, अहितायू, सुखायू, दुखा:यु अशा चार प्रकारच्या आयुष्याचे हित आहे व प्रमाण ज्यात सांगितले आहेत. त्याला आयुर्वेद असे नाव आहे.
आयुर्वेदाचे ‘स्वास्थ्यानुवृत्तीकर’ व ‘रोगच्छेदकर’ असे दोन भाग आहेत. हेतू, लक्षणे व औषधी विज्ञान असे तीन स्कंध आहेत. म्हणजे त्याला त्रिस्कंध आयुर्वेद असे म्हणतात. यात शरीराचा विचार पुढील प्रमाणे केला आहे.
तत्र शरीरं नाम चेतानाधिष्ठाभूतं
पंचमहाभूतविकारसमुदयातमकम
अर्थ: शरीर म्हणजे चेतनातत्त्वाला अधिष्ठान असलेली पंचमहाभूतांच्या अनेक विकारांनी युक्त असलेली वस्तू होय.
देह, इंद्रिय, मन, आत्मा मिळून शरीर बनते. या चारींच्या संयोगाला जीवन किंवा आयुष्य अशी संज्ञा आहे. ‘पंचमहाभूतविकारसमुदायात्मकम’ ते स्तुल शरीर व ‘चेतनाधिष्ठानभूत’ ते सूक्ष्म शरीर होय. सचेतन परमाणु हाच शरीर अवयवाचा शेवटचा भाग असून त्याचे स्वरूप अतिसूक्ष्म व अती अतींद्रिय आहे. तसेच ते परमाणु सुद्धा अनेक आहेत. इथपर्यंत आधुनिक शास्त्रे व आयुर्वेद यांचे सामान्यतः साम्य आहे. परंतु हे परमाणु स्वतंत्र नसून कर्म स्वभावाला धरून त्याचे संयोग विभाग होतात, असे मानणे आयुर्वेदाचे वेगळेपण आहे.
द्वारकाधीश दिगंबर जोशी
संस्कृत अध्यापक
जळगाव
0257-2236815