तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

0

नवी मुंबई : उरण परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय नराधमाने आपल्या शेजारी राहणाऱ्या ३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. उरण पोलिसांनी या नराधमाविरोधात बलात्कारासह पॉक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या प्रकरणातील अटक आरोपी विवाहित असून, त्याची पत्नी लहान मुलासह गावी राहण्यास आहे. आरोपी हा खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करून उरण भागात आपल्या बहिणींसह राहत आहे. या आरोपीची बहीण शेजारी राहणाऱ्या पीडित मुलीला आपल्या घरी खेळण्यासाठी घेऊन येत होती- शुक्रवारी दुपारीदेखील आरोपीच्या बहिणीने शेजारी राहणाऱ्या मुलीला आपल्या घरी खेळण्यासाठी आणले होते.

आरोपीने पीडित मुलीला खेळवण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर घारबरलेली पीडित मुलगी घरी गेल्यानंतर एका कोपऱ्यात गुपचुप बसल्याने तिच्या आईने तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने घाबरुन काहीच सांगितले नाही- त्यानंतर पीडित मुलीच्या आईने रात्री मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये नेऊन तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.

Leave A Reply

Your email address will not be published.