अतिरेक्यांच्या संपर्कात असलेला वेब डेव्हलपरला अटक

0

छत्रपती संभाजीनगर:;– शहरातील काही महत्त्वाच्या प्रतिष्ठानांमध्ये घातपात करण्याच्या कटात सहभाग असल्याच्या आरोपावरून एकाला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने बुधवारी हर्सल परिसरातील बेरीबाग येथून अटक केली. मोहम्मद झोहेब खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो एक वेब डेव्हलपर असल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून तो एनआयएच्या नजरेत आला होता. झोहेब छत्रपती संभाजीनगरमधील काही महत्त्वाच्या प्रतिष्ठानांमध्ये घातपात घडवून आणण्याचा कट शिजत असल्याची माहिती एनआयएला मिळाली

होती. त्याआधारे शहरातील विविध ठिकार्ण ९ संशयितांच्या घरावर एनआयएच्या पथकाने छापेमारी केली होती. या तपासणीत काही महत्त्वाची कागदपत्रे व लॅपटॉप् व इतर साहित्यही पथकाने जप्त केल आहे. मोहम्मद झोहेब खानविरोधात एनआयएने गुन्हा दाखल केला असून त्याने व त्याच्या साथीदारांनी इसिसमध्य सहभागी होत विविध आस्थापनांमध्य घातपात घडवून आणण्याची योजन आखली होती. तसेच मोहम्म खान झोहेब खान हा समाजातील तरुणांना इसिसमध्य सहभागी होण्यासाठी प्रेरित करत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.