विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी रविवारी `राईस` अभियानाचा शुभारंभ

0

जळगाव;- आधुनिक युगात विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, जीवन मूल्य आणि सहनशीलता या गुणांची कमतरता दिसून येत आहे, दुसरीकडे अंमली पदार्थांची व्यसनाधिनता आणि डिजिटल व्यसनाधिनतेमुळे ते दिशाहीन होतात. त्याचबरोबर प्रतिस्पर्धेच्या या युगात ते मागे पडतात याची परिणीती म्हणून अशा विद्याथ्र्यांमध्ये आत्महत्या सारख्या मार्गाचा अवलंब करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी ब्रह्माकुमारीज्चे आध्यात्मिक सशक्तिकरणाने स्वर्णीम भारताचा उदय अभियानाचा शुभारंभ रविवार होत आहे.

राष्ट्रपतींनी गौरविलेले अभियान :

शिक्षण जगात निर्माण झालेल्या या समस्या दूर करण्यासाठी ब्रह्माकुमारीज शिक्षा प्रभागामार्फत सन 2023-24 मध्ये राष्ट्रीय पातळीवर ` RISE : Rising India through Spiritual Empowerment – आध्यात्मिक सशक्तिकरणाने स्वर्णीम भारताचा उदय` हे अभियान सुरु झालेले असून त्याचा राष्ट्रीय शुभारंभ भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांनी ब्रह्माकुमारीज्चे आंतरराष्ट्रीय मुख्यालय, शांतीवन येथे केला. या अभियानात शिक्षण प्रभागाद्वारे राष्ट्रीय शिक्षण अभियान स्वरुपात संपूर्ण भारतात शाळा व महाविद्यालयातील विद्याथ्र्यां आणि शिक्षकांना जीवन मूल्यांनी सशक्त बनविण्याचे उदिष्ट ठेवले आहे.

एक लाखाहून अधिक कार्यक्रम:

अभियानात ब्रह्माकुमारीज्च्या पाच हजाराहून अधिक सेवाकेंद्रामार्फत राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी एक लाखाहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल ज्यात राजयोग मेडिटेशन कोर्स, मूल्य शिक्षण अभ्यासक्रम, काउंसलिंग सत्र, थॉट लॅब, प्रेरक व्याख्यान, मूल्यशिक्षण खेळ आदिंच्या माध्यमातून विद्यार्थींमध्ये आत्मविश्वास वाढविणे, पर्यावरण जागरुकता, सृजनशिलतेत वृद्धी करुन त्यांना मूल्यनिष्ठ नागरिक बनण्यासाठी प्रेरीत करणे यावर भर आहे. याबरोबरच चांगले आचरण, चाल-चलन आणि नैतिक प्रदर्शनाच्या आधारावर अॅबेंसडर ऑफ गुडनेस रुपात विद्याथ्र्यांना सन्मानीत सुद्धा केले जाणार असल्याचे ब्रह्माकुमारीज् माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले.

विशेष अतिथी : राजयोगीनी ब्र.कु. सुमनदीदी, माऊंट आबू

अभियानाच्या विभागीय शुभारंभ रविवार दि. 15 ऑक्टोबर, 2023 रोजी ब्रह्माकुमारीज् ढाके कॉलनी मुख्य सेवाकेंद्रात सकाळी 10 वाजता आयोजित केला असून अभियानाचा शुभारंभ माऊंट आबूहून राजयोगीनी ब्रह्माकुमारी सुमनदीदी, राष्ट्रीय संयोजिका, शिक्षण प्रभाग यांच्या शुभहस्ते होणार आहे. ब्र.कु. नरेशभाई, माऊंट आबू, प्रा. डॉ. ममता शर्मा, अहमदबाद, ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, जळगाव, प्रा.विकास साळुंखे, नाशिक, प्रा. पंकज पाटील, जळगाव यांची विशेष उपस्थिती असेल. कार्यक्रमास विद्यापीठ, महाविद्यालय आणि शिक्षणक्षेत्रातील गणमान्य नागरीक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.