आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्यात मानसोपचार विभागाला यश

0

१० ऑगस्ट – जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस

जळगाव – अभ्यासात मागे असणे, हातात पैसा नसणे.., नोकरी न लागणे… व्यवसायात नुकसान होणे.., कौटूबिक वादातून आलेले नैराश्य… अशा विविध कारणांमुळे मानसिक रुग्ण झालेल्या व्यक्ती आत्महत्येच्या विचारासह काही व्यक्ती कृतीपर्यंत पोहोचतात. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या रुग्णांवर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात समुपदेशन करुन उपचार केले जातात. दर आठवड्याला ४ ते ५ रुग्णांवर येथे उपचार होत असून मागील वर्षभरात हजारो रुग्ण आत्महत्येचा विचारापासून परावृत्त करण्यात मानसोपचार विभागाला यश आले आहे.

डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात अतिदक्षता विभागासह स्वतंत्र मानसोपचार विभाग रुग्णांची सेवा सुश्रूषा करत आहे. मानसिक आजाराच्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार येथे होतात. आयुष्यात आता काही राहिले नाही, असे ज्यावेळी वाटायला लागते, त्यावेळी माणूस उदासिन होतो आणि मग आत्महत्येचा विचार त्याच्या मनात घर करतात. परिणामी आत्महत्येचा प्रयत्न व्यक्ती करतो असा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्यावर येथील अतिदक्षता विभागात उपचार करुन रुग्णाचा जीव तर येथे वाचविला जातोच याशिवाय मानसोपचार तज्ञ डॉ. मयूर मुठे, डॉ. विलास चव्हाण यांच्यासह टिमद्वारे समुपदेशन करुन रुग्णाला आत्महत्येचा विचारापासून परावृत्त करतात.

व्यक्तीला नैराश्य येवून आत्महत्येचा विचाराकडे जाण्यापर्यंतच्या तीन पातळ्या आहेत. त्यात सौम्य, मध्यम आणि तीव्र असे त्याचे प्रकार पडतात. सौम्य यात रुग्णाला उदासिन वाटते, कामात मन न लागणे, लक्ष केंद्रित करण्यास अडचण येणे तर मध्यम पातळीत झोप न लागणे, भूक न लागणे अशा समस्या उद्भवतात. आणि तीव्रता म्हणजे टीव्ही, रेडिओपासून दूर राहणे, एकांतात राहावेसे वाटणे असे लक्षणे दिसतात. वरील सर्व लक्षणांनुसार मानसोपचार विभागात ओपीडीमध्येही औषधी देवून उपचार केले जातात तसेच रुग्णांची लक्षणे तीव्र असल्यावर मानसोपचार वॉर्डात अॅडमिट करुन घेत विविध थेरपी, शास्त्रशुद्धरित्या विविध उपचार पद्धतींचा अवलंब करुन रुग्णाला आजारातून बाहेर काढले जाते. मानसोपचार तज्ञ बनतात रुग्णांचे हितचिंतक

मानसिक रुग्णाला सहानुभूतीची खूप गरज असते अशा अवस्थेत त्याला कुटूंबियांपेक्षा अन्य कोणी जसे की मानसोपचार तज्ञ जे सांगतात ते रुग्ण ऐकतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक रुग्णांचे उपचारानंतरही हितचिंतक बनले आहे डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ. येथे डॉ. मयूर मुठे, डॉ. विलास चव्हाण यांच्यासह डॉ. विकास, डॉ. सौरभ, डॉ. आदित्य, समुपदेशक बबन ठाकरे ह्या टिमद्वारे यशस्वी उपचार येथे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी निवासी डॉ. आदित्य यांच्याशी ९४०४४७६१११ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.