हिट अँड रन प्रकरणावरून अधिवेशनात गदारोळ

दुसऱ्या दिवशीही घोषणाबाजी अन आरोप प्रत्यारोप

0

 

नवी दिल्ली

विधानसभेचा पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसाची सुरुवातही जोरदार झाली आहे. काल पहिल्या दिवशीही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली होती. आजही सत्ताधाऱ्यांनी विरोधकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एक अकेला मोदी, सब पर भारी, अशा घोषणेचे बॅनर घेऊन सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका केली. तर विधानसभेच्या पायऱ्यांवर उभं राहून विरोधकांनीही जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. शेतकरी, उद्योग धंदे परराज्यात गेल्यावरुन विरोधकांची घोषणाबाजी सुरू केली होती.

 

विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधानसभेत चांगलाच गदारोळ माजला. हिट अँड रन प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनी निवेदन केले. पुणे अपघात प्रकरणात आतापर्यंत सरकारनं काय कार्यवाही केली, याबाबतची सविस्तर माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

दरम्यान विजय वडेट्टीवार आक्रमक झाले. पुण्याचा उडता पंजाब होत आहे. कायद्याचा कुठलाही धाक राहिलेला नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.