१६ मार्चपासून आश्मीचे चित्रप्रदर्शन

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

१५ वर्षीय आश्मी मिलींद समणपूरे इयत्ता 10 वी काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल ची विद्यार्थीनी हीचे चित्रांचे प्रदर्शन १६ मार्च पासून सूरू होत आहे.यात पावडर शेडींग व पेस्टल कलर चित्र सादर करण्यात येणार आहे.
डॉ. मिलींद व डॉ. पुनम समणपूरे यांची कन्या आश्मी हिच्या प्रर्दशनाचे १६ मार्च रोजी े उद्घाटन जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन,झपुर्झा म्युझीयम पुणे फॉउंडर तसेच पु.ना गाडगीळचे अध्यक्ष अजितजी गाडगीळ, गोदावरी फॉउंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील, यांच्या उपस्थीतीत दु ११ वा होणार आहे.
व हे प्रदर्शन दररोज सकाळी ११ वा. ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले राहणार आहे. वयाच्या १० व्या वर्षापासून चित्राची आवड असलेल्या आश्मीचे गुण ओळखून चित्रकला शिक्षक तरूण भाटे सर यांनी तिला प्रशिक्षण दिले आहे. गुरूच्या मार्गदर्शनाखाली तिची वाटचाल सूरू असून चित्र व त्यातील बारकावे ओळखून अल्पावधीतच सोलो आर्ट, पावडर शेडींग प्रकारात तिने यावर प्रभुत्व मिळवले. चित्रप्रदर्शनात भारतीय हिरो माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम, महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज, सिनेकलाकारासह सामाजिक चित्र ठेवण्यात आली आहे. ३१ मार्च पर्यंत सकाळी ११ ते ७ या वेळेत सूरू राहणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समणपूरे परिवाराकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.