लाथ मारसु, तडून पाणी काढसु – यजुर्वेंद्र महाजन

0

जळगाव येथे युवाशक्ती महासंगम जिल्हा संमेलन

स्वप्नील काळे , लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुल येथे मंगळवार दि. १४ मार्च २०२३ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत जिल्हा संमेलन आयोजित करण्यात आले. जिल्हा संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना ते म्हणाले की, पैसा पद आणि प्रतिष्ठा यासाठी भविष्यात कधीच काम करू नका, नेहमी राष्ट्राचा विचार करा. समस्या म्हणजे आयुष्यात आलेल्या संधी असतात म्हणून नेहमी त्यांना सामोरे जा. रोजच्या वेळेतून थोडासा वेळ हा राष्ट्रासाठी दिला पाहिजे जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या बाहेर पडत नाही, तोपर्यंत तुम्ही एक माणूस म्हणून घडू शकत नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले.

पुढे प्रा. डॉ. केतन नारखेडे म्हणाले कि, स्वप्न पूर्ण करायचे असतील तर कौशल्य आत्मसात केले पाहिजे. शिक्षण हा एक अतिमहत्त्वाचा विषय आहे. असे बोलून त्यांनी काही यशस्वी विद्यार्थ्यांच्या अयशस्वी गोष्टी सांगितल्या.

कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर संमेलन प्रमुख चिन्मय महाजन, विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीयमंत्री अंकिता पवार आणि मयूर माळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका जाधव हिने केले. उपस्थित मान्यवरांचे आभार चिन्मय महाजन यांनी मानले

 

Leave A Reply

Your email address will not be published.