जिल्ह्यातील ३५ हजारांवर शासकीय कर्मचारी संपात सहभागी

0

शाळा-महाविद्यालयांसह शासकीय कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जिल्ह्यातील ३५ हजाराहून अधिक कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले असून अनेक कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज १४ मार्च रोजी घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले.
संपामुळे शाळा-महाविद्यालयांसह सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट दिसून आला .

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून विविध संघटना एकत्र आल्या. दिवसभर घोषणाबाजी करून दुपारनंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले.जिल्ह्यातील ५६ शासकीय आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला.

संपात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागनिहाय संख्या पुढील प्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (२३६००), जिल्हा परिषद (८४४४), करमणूक शाखा (५), कोषागार कार्यालय (५९), पाटबंधारे विभाग (३०७), गिरणा पाटबंधारे (१०६), सहायक उपनिबंधक (४३), जिल्हा नियोजन (४), मानव विकास समिती (२), अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र (१५), जिल्हा कौशल्य विकास (४), सहकारी संस्था (१६), कामगार आयुक्त (७), भूमिअभिलेख (२२४), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (५०), आदिवासी विकास प्रकल्प (२५), स्थानिक निधी लेखापरिक्षक (२५), कृषी विभाग (३४२), पशुसंवर्धन विभाग (२२).

 

Leave A Reply

Your email address will not be published.